खबरे

मुंबई : नितीन आगे ला न्याय मिळावा यासाठी विद्यार्थी भारती चे लाक्षणिक उपोषण…

मुंबई ,11 डिसेम्बर : नितीन आगे ला न्याय मिळावा यासाठी विद्यार्थी भारती चे लाक्षणिक उपोषण…
२०१४ साली अहमदनगर जिल्ह्यात खर्डा या गावी नितीन आगे ची अमानुष पाने हत्या करण्यात आली. ११ वी ला असणाऱ्या या तरुणाची एका उच्चजातीय मुलीशी जवळची मैत्री होती आणि यामुळे त्याच गावातील उच्चजातीय लोकांनी नितीन ला शाळेतून अनोळख्या ठिकाणी खेचत नेऊन त्याला मारहाण केली व त्याला जीवानिशी मारून टाकले आणि गावात झाडावर लटकवले.

हे प्रकरण घडल्यानंतर अनेक पुरावे असताना देखील साक्षीदारफितूर झाले असे सांगून जिल्हा सत्र न्यायालयाने नितीन आगे ला न्याय दिलेला नाही असा आरोप विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा विजेता भोनकर यांनी केला आहे.

विद्यार्थी  भारती संघटना के छात्रों का नितिन के समर्थन में अनशन ,आजाद मैदान पर जुटे विद्यार्थी.

 नितीन आगेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी विद्यार्थी भारती तर्फे आझाद मैदान येथे उपोषण करण्यात आले व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते तसेच 11 वी विद्यार्थी देखिल उपोषणाला बसले असल्याचे विद्यार्थी भारती कार्यद्यक्षा स्मिता साळुंखे यांनी म्हटले.‎नितीन आगे वर झालेला हा अन्याय विद्यार्थी भारती कदापिही सहन करणार नाही आज एक नितीन गेला पुढे अनेक जायला वेळ लागणार नाही असे विद्यार्थी भारती राज्यसंघटक स्वप्निल तरे यांनी म्हटले आहे.11वी च्या असणाऱ्या तरुण विद्यार्थ्याला ज्या अमानुषपणे मारण्यात आले तसेच न्यायव्यवस्थे निकाल हा आता जातीव्यावस्थेनुसार ठरवण्यात येणार आहे का ? असा प्रश्न कोकण अद्यक्षा मंजिरी धुरी यांनी विचारला असून नितीन आगे ला न्याय मिळाला पाहिजे यासाठी विद्यार्थी भारती पुन्हां रस्त्यावर उतरले आहे 

आज उपोषणातील मागण्या पुढील प्रमाणे ..

‎१;  ही केस फास्टट्रेक कोर्टात घेतली पाहिजे .
‎2; CBI चोकशी करण्यात यावी .
‎3; मोकाट फिरणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे .
‎4; फितूर झालेल्या साक्षीदारांची चोकशी करण्यात यावी या मागण्या असून आज ज्या विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले होते त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी माजी न्यायाधीश व मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थुल सर आले व या लाक्षणिक उपोषणाचे समारोप त्यांच्या भाषणाने झाले असे विद्यार्थी भारती विद्यापीठ अध्यक्षा ज्योती निकाळजे यांनी म्हटले आहे.
           ‎
  ‎विद्यार्थी भारतीच्या शिष्टमंडळाने गृह विभागाचे उप सचिव मा. सूर्यकांत निकम सरांची भेट घेतली व त्यांना निवेदन देण्यात आले असून उप सचिव यांनी विद्यार्थी भारतीचे निवेदन लवकरच अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे मुंबई संघटक शुभम राऊत यांनी म्हटले आहे.

नितीन आगेला न्याय मिळावा यासाठी ही लढाई इथेच न थांबता पुढे ही अशाच पद्धतीने चालत राहील व विद्यार्थी भारती लवकरच नितीन आगेच्या शिक्षकांना व गावातील पोलीस यंत्रणेला GET WELL SOON आंदोलन करणार असल्याचे विद्यापीठ कार्यद्यक्षा  मोनाली भोईर यांनी म्हटल्याचे मुंबई अद्यक्षा प्रणय घरत यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे..
           ‎

Related Articles

Back to top button
Close