खबरेमुंबई

“हवा तेज़ है दिनकर राव, टोपी संभालो, उड़ जाएगा” : विनोद व्यंकट जगदाळे

मुंबई ;18 नवम्बर : गुजरात मधे राजकीय वातावरण तापु लागले आहे,भाजपचे हु छू विकास हु छू गुजरात म्हणजेच मि आहे विकास मि आहे गुजरात हे बैनर दिसत आहेत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजप अध्यक्ष अमित शाह,मुख्यमंत्री विजय रुपाणी,उपमुख्यमंत्री नितिन पटेल आणि गुजरातचे प्रदेश अध्यक्ष यांचा फ़ोटो आहे, हयातीती असलेले आणि गुजरात हुन लोकसभा निवडणूक लढवणारे लालकृष्ण आडवाणी यांचा आणि माजी प्रधानमंत्री अटलजी यांचा फ़ोटो नाही,कदाचित मोदी आणि शाह यानां वाटत असेल की या वरिष्ठ नेत्यांच्या नावाने मत नाही मिळणार म्हणूनच त्याच्या फोटोला फाटा देण्यात आला आहे,

vinod jgdale 1
लेखक :;विनोद व्यंकट जगदाळे, ,न्यूज़ 24 या राष्ट्रीय वृत्तवाहिनीत, महाराष्ट्र ब्यूरो पदावर कार्यरत आहेत

राहुल गांधीच्या नवसर्जन यात्रेच्या निमित्ताने उत्तर गुजरात मधे जाण्याचा योग आला,बनासकाठा,साबर कांठा,पाटण आणि मेहसाणा जिल्ह्यात ही यात्रा फिरत होती,बनासकाठा,साबरकांठा जिल्ह्यात अल्पेश ठाकोर आणि त्याच्या क्षत्रिय ठाकोर सेनेचे प्राबल्य दिसून आले जागो जागी गळ्यात लाल रंगाचे उपरणे घालून जय माताजी जय माताजी नारे देत लोक त्यांचे स्वागत करत होते,राहुल गाँधीची नवसर्जन यात्रा 4 टप्प्यात झाली सौराष्ट्र,मध्य गुजरात,दक्षिण गुजरात आणि शेवटी उत्तर गुजरात, पटेल समाजाचे प्राबल्य असलेल्या मेहसाणा जिल्ह्यात राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले गर्दी एवढी की हे स्वागत रोड शो मधे बदलले,गर्दी मधे सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे पटेल समाजाच्या महिला राहुल गाँधीच्या स्वागता साठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उत्तरल्या होत्या.

 –
जय सरदार जय सरदार या घोषणा प्रत्येकाच्या तोंडी होत्या, पटेल समाज जेव्हा भाजपा सोबत होता तेव्हा मेहसाणा मधे कांग्रेस आपला बैनर लावु शकत नव्हती कॉर्नर सभा तर लांबची गोष्ट पण आता त्याच मेहसाणा मधे जवळपास 1 लाख लोक राहुल गाँधीच्या रोड शो आणि सभे मधे उपस्थित होते,मेहसाणा हा मतदार संघ गुजरातच्या उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांचा मतदार संघ राहुलच्या रोड शो पाहुन नितिन पटेल यानां पुढच्या महिन्याच्या शेवटी त्यांचे काय होणार याचा अंदाज अलाच असेल,नवसर्जन यात्रेच्या शेवटी विसनगरला राहुल गांधीची सभा झाली ती आतापर्यंतच्या सभामधील सर्वात मोठी सभा होती,मुख्यमंत्री विजय रुपाणी हे हार्दिक पटेलला काँग्रेसचा एजेंट म्हणून हिणवतात पण काही ही असो या वेळेस पटेल समाज हा भाजपला धडा शिकवणारच,गुजरात मधे जवळपास गतप्राण झालेल्या काँग्रेसला 2015 मधे जिल्हापरिषद आणि महापालिका निवडणुकीत जे यश मिळाले ते पटेल समाजाचा मतांनीच.
 –
गुजरात मधे हवा बदलत चालली आहे भाजपच मिशन 150 सुरु आहे पण ही निवडणुक भाजपला एवढी ही सोप्पी नाही हे गुजारत मधील पोर टोर ही सांगू शकतील,गुजरात मधे जर खरोखर विकास झाला आहे तर स्वतः पार्टी अध्यक्ष अमित शाह सूरत शहरात घरो घरी जाऊन पत्रक वाटून मत मागत का मागत आहेत हा प्रश्न तेथील जनता विचारत आहे,सोनिया गांधी असो शरद पवार की बाळासाहेब ठाकरे असो कधी ही या नेत्यांनी दारोदारी जाऊन मतांचा जोगवा मागितला नाही,3 दिवस सूरत शहरात फिरताना नोटबंदी आणि जीएसटी मुळे कपडा उद्योगाची झालेली वाताहत दिसून येते, 2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप ने 12 च्या 12 जागा आपल्या खिशात घातल्या होत्या.
 
 –
आताच्या निवडणुकीत या 12 मधील 5 जागा या भाजपच्या हातून निसटू शकतात याचे कारण या 5 मतदार संघात पटेल समाजाचे असलेले प्राबल्य,नोट बंदी आणि जीएसटी मुळे दुखावलेले व्यापारी आतून धुमसत आहेत,जीएसटी विरोधात जुलै 2017 मधे 37 हज़ार व्यापारी लोकांनी 18 दिवस संप केला तेव्हा 1 ही भाजपचा आमदार,खासदार किंवा मंत्री यांची विचारपुस करवयास आला नाही,गुजरात कांग्रेस प्रभारी अशोक गहलोत व्यापारी समुदयास भेटण्या साठी आले पण याच व्यापारी लोकांनी मोदी मोदी मोदी घोषणा देवून त्यांना पिटाळून लावले ही त्यांची चूक होती हे व्यापारी आता बोलत आहेत.
 –
राहुल गाँधीच्या गुजरात दौऱ्यामुळे आणि बदलत्या राजकीय वातावरणा मुळे भाजपच्या अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी कित्येक वस्तु वर जीएसटी कमी केला पण कपडा व्यापारी वर्गास फ़क्त निरशाच पदरी पडली, गुजरात मधील लोक म्हणत आहेत की,”गुजरात मे फटी इसलिए जीएसटी घटी”सूरत मधील व्यापारी 3 जुलै 2017 ही तारीख कधीच विसरत नाहीत या दिवशी संपकरी व्यापारी वर्गाला पोलिसांनी लाठया काठयानी बडवले एका व्यापारी माणसाची प्रतिक्रिया फार बोलकी होती तो म्हणाला की मोदी 39%टक्के मत घेऊन देशाचे पीएम झाले पण त्यांनी हे ही विसरु नए की देशभरात कपड़ा व्यापारी आणि संबंधित उद्योगा शी जोडलेल्या लोकांची देशभरात 13% टक्के मते आहेत..जीएसटी मुळे नाराज झालेल्या कित्येक कपड़ा व्यापारी जे भाजपचे पदाधिकारी होते त्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीची वाट धरली आहे 
 –
व्यापारी वर्गाची मत आपल्यालाच मिळतील हा भाजपचा दावा आहे भाजपचे नेते सांगत आहेत की,  “वो रूठेंगे लेकिन टूटेंगे नहीं” हा भाजपचा आत्मविश्वास आत्मघातकी वाटत आहे, सूरत मधील व्यापारी एक वेळेस काँग्रेसला मतदान करणार नाहीत पण भाजपला ही मतदान करण्याची शक्यता कमीच आहे, काँग्रेसची स्थिती या वेळेस सुधारेल हे नक्कीच आहे पण कांग्रेस ने टिकिट वाटपात घोळ केला की समजायचे की काँग्रेसला संपवण्यासाठी विरोधकांची गरज नाही तिचे नेतेच हे काम करतील,हार्दिक पटेल यांची रोज नव नवीन कथित सीडी भाजप समोर आणत आहे त्यामुळे भाजप कडे राहिलेली जी काही पाटीदार मते होती ती ही आता कांग्रेसकडे वळती होत आहेत.
kbn10 news ,22
 –
 गुजरात मधील 2007 ची विधानसभा असो किंवा 2012 ची निवडणूक भाजप आणि कांग्रेस यांच्या जिंकलेल्या जागा मधे फार फरक असेल पण मतांच्या टक्केवारी मधे फार जास्त फरक नाही, 2007 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 49.12 टक्के मत मिळाली तर काँग्रेसला 39.63 टक्के,म्हणजेच भाजपला 9.51 टक्के जास्त मते कांग्रेस पेक्षा मिळाली,2012 च्या निवडणुकीत भाजपला 47.9 टक्के तर काँग्रेसला 38.9 इथे ही 9 टक्के जास्त मते भाजप ने प्राप्त केली पण एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की 2007 आणि 2012 गुजरात विधानसभा निवडणुकीत पटेल म्हणजेच पाटीदार समाज हा सावली सारखा भाजपच्या पाठी होता जो या निवडणुकीत सध्या तरी भाजपच्या निवडणुकीत विरोधात दिसत आहे.
 
भाजप साठी चिंतेची एक गोष्ट ही सुद्धा आहे की 2012 च्या निवडणुकीत मोदी स्वतः मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असुन ही मोदी सरकारचे 6 कैबिनेट मंत्री पराभूत झाले होते आणि जवळ जवळ 30 विधानसभेच्या जागा भाजपने 5 हज़ार पेक्षा कमी मतांच्या फरकानी जिंकलेल्या होत्या, गुजरात मधे एक एक मत भाजप साठी महत्वाचे असताना आता शिवसेनेने ही गुजरातच्या तालमित ली माती कपाळी लावत विधानसभेच्या 50 जागा हिंदुत्व आणि राममंदिर सारख्या ज्वलंत विषयावर लडण्याची तैयारी केली आहे,हिन्दुत्वाची फैक्टरी समजल्या जाणाऱ्या गुजरात राज्यात शिवसेना फार मोठा चमत्कार तर नाही करणार पण थोड्या फार जागी भाजपच्या विजयाचे गणित बिघडवू शकते,पद्मावती सिनेमा मुळे गुजरात मधील राजपूत समाज दुःखावला आहे.
 –
काँग्रेसला आणि राहुल गांधीला या निवडणुकीत गमवण्यासारखे काहीच नाही मोदी सरकार केंद्रात आल्यापासुन पंजाब राज्य सोडले तर इतरत्र  राज्या मधील विधानसभा निवडणुकीत कांग्रेसला पराभव सहन करावा लागला आहे इतकेच काय गुजरातच मधील मागील 4 विधानसभा निवडणुकीत कांग्रेस पक्षाने सपाटून मार खाल्ला आहे पण गुजरातच्या निवडणुकी मुळे एक वेगळे राहुल गांधी यावेळेस
 –
लोकांना दिसले… मागील 5 वर्षा मधे राहुल गांधीचा सोशल मीडिया मधे जो उल्लेख भाजप समर्थक वा कार्यकर्त्यांनी केला त्याच राहुल गाँधीचे हैशटैग ट्वीट्सला लोकांची पसंती मिळत आहे,”विकास गांडो थय गयो”,” शाह ज़्यादा खा गया” आणि जीएसटी बाबत केलेले ट्वीट 
 –
“गब्बर सिंह टैक्स” ला लाखो हिट्स आणि री ट्वीट्स मिळाले 
 –
शाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 जाहिर सभा गुजरात मधे घेणार आहेत यावरून हे स्पष्ट होत आहे की गुजरातची निवडणूक भाजपला सोप्पी राहिलेली नाही…गुजरातच्या एकूणच राजकीय परिस्थिती कडे पहिले तर 1990 साली प्रदर्शित झालेला अग्निपथ सिनेमा मधला तो संवाद आठवतो,ज्यामधे अमिताभ बच्चन, गोगा कपुरला म्हणतो.
 –
“हवा तेज चलता है,दिनकरराव टोपी संभालो,उड़ जाएगा” 

Related Articles

Back to top button
Close