पालघर : व्यवहार मराठीत करा, अन्यथा बँकांना पालघर मनसेचा “खळ्ळ् खट्याळ” चा इशारा.
पालघर दि. 24 – प्रादेशिक भाषा ही बँकांच्या दैनंदिन व्यवहाराचे माध्यम असले पाहिजे असा केंद्र सरकार आणि आरबीआय चा नियम आहे. परंतु, बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे आणि केंद्र सरकारच्या दबावापुढे झुकत हिंदी भाषा माथी मारण्याचे प्रकार सुरू आहेत. या निषेधार्थ मनसे कडून आज पालघर मधील सर्व बँकांना त्यांच्या बँकशाखेतील कार्यालयीन कामकाज व नामफलक मराठीत करणे बाबत निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील बँकांचे व्यवहार मराठीत झालेच पाहिजेत, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत दिला होता. या पार्श्वभूमीवर आज पालघर मधील सर्व बँकेच्या व्यवस्थापकांना मनसे कडून निवेदन देण्यात आले. बँकेकडून आर.बी.आय. (RBI) च्या नियमांची पायमल्ली होत असून, बँकांमध्ये मराठीचा वापर नगण्यच असल्याचे स्पष्ट आहे. म्हणजेच, आपण नियमांचे उघडपणे उल्लंघन करून, आपण महाराष्ट्रातील जनतेचा आणि मराठी भाषेचा अपमान करीत असल्याचा आरोप या निवेदन पत्रात केला आहे. तसेच येत्या आठ दिवसात आपण आपल्या बँकेतील कार्यालयीन कामकाज व नामफलक मराठीत न केल्यास, आम्हांला आपल्या विरोधात “खळ्ळ् खट्याळ” आंदोलन करावे लागेल असा इशाराच मनसेचे पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत यांच्या कडून सबंधित बँक शाखेच्या सर्व व्यवस्थाकांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
स
दरचे निवेदन पत्र देतांना मनसेचे पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, माजी उपशहर अध्यक्ष उदय माने, विभाग अध्यक्ष संदीप किणी, मंगेश घरत, रत्नदीप पाखरे, हेमंत घोडके तसेच नरेश देशमुख, विजय मांढरे, इशांत प्रधान, बळदेव बेंदर, नयन पाटील, आकाश भोईर,अक्षय पाटील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.