पालघर जिल्ह्यातल्या दिव्यांग विदयार्थ्यांच्या कला,क्रिडा स्पर्धा संपन्न
नीता चौरे ,पालघर : विशेष गरजा असणाऱ्या बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्यात असलेल्या अध्ययन शैलीनुसार सूप्त गुणांचा विकास होण्यासाठी सर्वाना समान संधी या तत्वानुसार कला,क्रिडा,संगित,नाटय , अभिनय क्षेत्रातही संघी देऊन इतरां प्रमाणं खेळता,गाता,अभिनय करता यावा या उद्देशानं समग्र शिक्षा अभियान जि.प.पालघर व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, पालघर यांच्या संयुक्त विद्यमानं
पालघर जिल्ह्यात जिल्हयातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कला,क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमाचं आयोजन शिरगांव ग्रामपंचायतीच्या ए-वन स्पोर्टस क्लब ग्राऊंडवर बुधवारी करण्यात आलं होतं .यात दिव्यांग विदयार्थ्यांच्या मतिमंद , कर्णबधिर व अस्थिव्यंग विदयार्थ्यांचे ५० मी, १०० मी धावणे, गोळाफेक ,
थाळीफेक,संगित खुर्ची, चित्रकला स्पर्धा तर अंध व बहुविकलांग मुलांच्या पास्सींग द बॉल, बादलीत बॉल टाकणं अशा स्पर्धा घेण्यात आल्या तसचं सर्व मुलांच्या गायन ,नृत्य तसेच वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
जिल्हा शिक्षण समिती सभापती तथा जि. प पालघर चे उपाध्यक्ष निलेश गंधे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व श्रीफळ फोडून या स्पर्धांचं उदघाटन करण्यात आलं . या प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन करताना सामान्य मुलं ज्याप्रमाणे विविध स्तरावर खेळांमध्ये सहभागी होऊन जागतिक स्तरापर्यंत सफल होत असतात, त्याचप्रमाणे जर दिव्यांग मुलांनाही संधी दिली तरनक्कीच ही मुलं जागतिक पॅराऑलिम्पीक पर्यंत मजल मारु शकतात.
त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना अशा संधी जिथं मिळतात तिथं आवर्जून उपस्थित ठेवावं व त्यांच्या कलागुणांना वाव दयावा असं मत व्यक्त केलं .खेळाडूना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी दोन उत्कृष्ट खेळाडूंसाठी रु .१००० पारितोषिक जाहीर करून त्यांना दिलं .
यावेळी प्रसंगी शिरगांव गावच्या सरपंच .चिन्मयी मोरे , शिक्षणाधिकारी (प्राथ.)राजेश कंकाळ , शिक्षणाधिकारी(माध्य.) जयवंत खोत उपशिक्षणाधिकारी (प्राथ.)विलास पिंपळे , शिक्षण विस्तार अधिकारी पं स.वाडा कृष्णा जाधव या आदी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी गावच्या समुद्र किनारी रंगणार सातवा चिकू फेस्टिवल………..