खबरे

तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब — शिवस्मारक

मुंबई -छत्रपती शिवाजी  महाराज प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे आणि अभिमानाचे प्रतीक.  सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामुळे असामान्य कामगीरीने महाराष्ट्राची फताका जगभर फडकवणाऱ्या महाराजांना राज्याच्या वतीने हे अनोखे वंदन आहे. राज्याच्या तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार असून युवा पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबरला होत आहे.जगातील सर्वाधिक उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कलादालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रवर आधारित पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय, प्रेषक गॅलरी हे मुख्य आकर्षण आहे. या स्मारकामुळे युवकांना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे ही राज्यातील जनतेची मागील पंधरा वर्षापासून मागणी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी तातडीने कार्यवाही पूर्ण करुन स्मारकाच्या कामास गती दिली. तसेच सर्व परवानग्या आवश्यक होत्या त्या तातडीने पूर्ण केल्यामुळेच कामाला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचा पहिल्या टप्प्यामध्ये 2 हजार 300 कोटी रुपयाचे कामे प्रस्तावित असून त्यामध्ये 210 मीटर इतकी उंची वाढविण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

राजभवनपासून जवळच असणाऱ्या समुद्रातील बेटावर जगातील सर्वात उंच असे स्मारक असेल. हा कार्यक्रम संस्मरण्य ठरावा यासाठी राज्यातील सुमारे 70 हून अधीक प्रमुख नद्यांचे जल आणि गडकिल्यावरची माती या ठिकाणी आणण्यात येणार आहे. समुद्रातील 15.96 हेक्टर बेटावर जगातील सर्वात उंच असे स्मारक असेल. महाराजांची जीवनमुल्य प्रर्दशित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात असल्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यटनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

Related Articles

Back to top button
Close