पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी गावच्या समुद्र किनारी रंगणार सातवा चिकू फेस्टिवल
[box type=”info” fontsize=”14″]बोर्डीतल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं एम.टी. डी.सी नं सुरू केलेल्या आणि आर.इ.डब्लू.एफ द्वारा आयोजित चिकू फेस्टिवल ला २०१३ या पहिल्या वर्षांपासूनचं घवघवीत यश मिळत आहे .मागील वर्षी या महोत्सवात सुमारे १७५ स्टॉल होते .तर यंदा २५० पेक्षा जास्त स्टॉल्स अपेक्षित आहेत .[/box]
नीता चौरे, पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्याच्या बोर्डी इथल्या समुद्र किनाऱ्यावरचं एस.आर.सावे कॅम्पिंग ग्राऊंड यंदाचा सातवा चिकू महोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झालं आहे .२ आणि ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चिकू फेस्टिवल मध्ये अनेक नवीन आकर्षणं असणार आहेत . बोर्डीतल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं एम.टी. डी.सी नं सुरू केलेल्या आणि आर.इ.डब्लू.एफ द्वारा आयोजित चिकू फेस्टिवल ला २०१३ या पहिल्या वर्षांपासूनचं घवघवीत यश मिळत आहे .मागील वर्षी या महोत्सवात सुमारे १७५ स्टॉल होते .तर यंदा २५० पेक्षा जास्त स्टॉल्स अपेक्षित आहेत .
चिकू फेस्टिवल आयोजित करणाऱ्या REWF या संस्थेत या परिसरातल्या सुशिक्षित व सुस्थापित अशा उद्योजकांचा व शेतकऱ्यांचा समावेश आहे .ग्रामीण भागातल्या स्थानिकांना संधी उपलब्ध देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत .चिकू महोत्सव हा त्यांनी वर्षभर आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांपैकी एक आहे .यंदा या महोत्सवात अनेक वेगळ्या गोष्टी पहायला मिळणार आहेत
चिकू महोत्सवातले काही उपक्रम :
आम्ही शेतकरी : ज्यात शेतकरी स्थानिक शेती उत्पादनांचे प्रदर्शन करतील .तर इतर काही आकर्षणांमध्ये अन्नदाता : नावाच्या खाद्यपदार्थ समर्पित विभागाचा समावेश आहे .वारली पेंटिंग आणि कागदी बॅग : तयार करण्याची एक कार्यशाळा ही या महोत्सवाचा एक भाग असेल .गारगोटी किंवा शंखांनी खेळलेले जुने खेळ , कार्टीयर आणि कॅलिग्राफी कलाकार ; मातीची भांडी बनवण्याचे वर्ग आणि समुद्र किनाऱ्यावरील वाळू शिल्पकला , यांचा ही यात समावेश असेल .एम टीव्ही बॉलीलँड चा विजेता सौरभ सावे याचं सुंदर व आकर्षक सादरीकरण हे या महोत्सवाचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे .सौरभ हा बॉलिवूड व मराठी संगीत सादर करणार असं आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे .
महोत्सवात महाराष्ट्रातल्या समृद्ध लोककला प्रदर्शित करण्यात येणार असून संपूर्ण दिवस लोक नृत्य , कोळी नृत्य , लावणी , लोकसंगीत , ढोल नृत्य , तारपा ,मर्दानी खेळ आणि महाराष्ट्रातील इतर लोकसंगीत , लोकनृत्यांच्या माध्यमातून अतिथींचं मनोरंजन करण्यात येईलं .
यंदा २ आणि ३ फेब्रुवारी रोजी पर्यटकांसाठी अतिरिक्त अनुभवजन्य शिबिर देखील होणार आहे .पर्यटक रात्रीच्या वेळी ते शिबीर , चित्रपट स्क्रिनिंग , बार्बेक्यू ,आकाश दर्शन आदींचा लाभ घेऊ शकतात .तर दिवसा डोंगर चढणं , चिकू शेती , बोर्डीच्या अंतर्गत भागात ३ ते ४ तासांचं सायकलींग ,कस्तुरबा गांधी यांच्या निवास स्थानाला भेट , स्वतंत्रता सेनानी स्मारक पाहणं , चिकू सफारी , चिकू वायनरी भेट आदी गोष्टी करता येतील .
वारली जमातीच्या लोकांचं राहणीमान , त्यांचे खाद्यपदार्थ आदींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी एक दिवसीय सहल आयोजित केली गेली आहे . पर्यटक या सहलीचे स्टॉल या संकेतस्थळावर बुक करू शकतात .आगाऊ बुकिंग ५ जानेवारी पासूनच सुरू झालेलं आहे . येणाऱ्या पर्यटकांसाठी सेंद्रिय कृषी उत्पादनं उपलब्ध करून देणं , याव्यतिरिक्त स्थानिक शेतकऱ्यांना नवनवीन संधी शोधण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती समजण्यासाठी सक्षम करणं हाही उद्देश आहे .हा महोत्सव जागतिक दालन उपलब्ध करत असल्यानं या क्षेत्रातल्या स्थानिक लोकांसाठी एक भक्कम अर्थव्यवस्था तयार करण्याचा हा एक प्रयत्न आहे .
हा महोत्सव खास करून स्त्री उद्योजिका व इतर उद्योजकांना ही प्रोत्साहन देतो .चिकू हे फळ या भागातलं उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे .या महोत्सवात भाग घेणं म्हणजे चं कुटुंब आणि मित्रांसोबत मनोरंजक अनुभव घेत असतानाच स्थानिकांना पाठिंबा देणं होय .
मागील वर्षी या चिकू महोत्सवानं दोन दिवसांत १ लाखा पेक्षा जास्त दर्शकांचा टप्पा गाठला तर १ कोटी रुपयां पेक्षा जास्त उलाढाल केली .या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य आहे .त्यामुळे तो आनंद आणि व्यवसाय या दोन्ही उद्देशासाठी उत्तम उपक्रम ठरतो .या महोत्सवाला केवळ पालघर जिल्ह्यातले चं नव्हे तर मुंबई ,ठाणे ,सुरत भागातले पर्यटक देखील आपली हजेरी लावत असतात .
प्रतिक्रिया :
या चिकू महोत्सवातून आम्हाला बोर्डी मधल्या पर्यटन उद्योग व शेती उत्पादनांपासून ते कला ,हस्तकला, आसपासची ऐतिहासिक स्थळं या गोष्टींवर प्रकाश टाकायचा आहे . यामुळे स्थानिक लोकांसाठी टिकाऊ अर्थव्यवस्था तयार करण्यास ही मदत होते .म्हणून दरवर्षी आम्ही नवीन घटकांचा समावेश करतो. जेणे करून पर्यटकांचं स्वारस्य टिकून राहील .
– ( अमोल पाटील , REWF चे अध्यक्ष )
नवीन पालघर जिल्हा मुख्यालय विकसित करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न.………….