पालघर – विद्यार्थीना वाॅट्सअप पडले भारी.. बारावीच्या भूगोलच्या पेपरच्या पोहचले उशीरा.
हर्षद पाटिल –
पालघर – पालघर मधील जवळपास 3० तो ३५ विद्यार्थीना बारावीच्या परीक्षेला मूकावे लागले आहे. आज बारावीचा भूगोल विषयाचा पेपर दूपारी अकरा ते दोन या वेळेत असताना विद्यार्थी उशीरा पोहचल्याने ते सदर विषयाचा पेपर देवु शकले नाही. पालघर मधील सोनोपंत दांडेकर महाविद्यालय येथील परिक्षा केंद्रावर 1052 विद्यार्थी बसले होते. मात्र त्यापैकि 1017 विद्यार्थी उपस्थित होते. तर ३० ते 35 विद्यार्थी सदर पेपरला उशीराने पोहचल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे त्याचे एक वर्ष वाया गेले आहे. सदर विद्यार्थांनी बारावी परीक्षेचे वेळापत्रक बेवसाईटवरुन अपलोट करुन ते वाँटसअप वर पाठविले होते .
वेळापत्रकांची कोणत्याही प्रकारे अधिकृत तपासणी अथवा चौकशी न करता सदर विद्यार्थी त्यांच्याकडे असलेल्या वेळापत्रकांप्रमाणे दोन वाजता परीक्षा केंद्रावर पोहचले. यातील 1.45 वाजता 10 विद्यार्थी पोहचले , तर बाकी विद्यार्थी दोन वाजल्यानंतर परीक्षा केंद्रावर पोहचले असल्याचे परीक्षा केंद्र प्रमुखानी सांगीतले आहे. बारावीचा भुगोल विषयाचा पेपर सकाशी ११ ते दुपारी २ या वेळेत होत्. मात्र या विद्यार्थांकडे असलेल्या वेळापत्रकांत त्यांची वेळ ३ ते ६ असल्याचे विद्यार्थी सांगत होते. या विद्यार्थांमध्ये जीवन विकास शिक्षण संस्थेचे तसेच सोनोपंत दांडेकर विद्यालयातील बारावीच्या विद्यार्थीचा समावेश आहे. दरम्यान या घटनेने विद्यार्थांचे वर्ष वाया गेल्याने पालक आणि विद्यार्थी कमालीचे नाराज झाले आहेत.
आता या विद्यार्थांना जुलै महिन्यात परीक्षा देता येणार आहे.