खबरे

छात्रशक्ती संस्थेच्या वतीने सफाळे सरूपाडा येथे प्रजासत्ताक दिनसाजरा करण्यात आला.

palghar =सालाबाद प्रमाणे याही वर्षी छात्रशक्ती संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन सफाळे सरूपाडा येथे साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी छात्रशक्ती संस्था नेहमीच विद्यार्थ्यांना व्यासपीठ देत असते. गेल्यावर्षी सरूपाडा या विभागातील मुलांसाठी 15 ऑगस्ट स्वतंत्रदिना निमित्त टॉय बँक आणि बूक बँक संस्थेच्या वतीने चालू करण्यात आले होते. याच शैक्षणिक कार्यक्रमाचा भाग म्हणून या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संगणक प्रशिक्षणा करीता छोट्या कॉम्पुटर लॅबचे उद्घाटन हे उद्घाटक मा ज्योती बडेकर(वाघिणी अध्यक्षा) यांनी केले.
या उपक्रमास विद्याधर ठाकूर (राष्ट्रिय सेवा दल), विनिशा धामणकर (पत्रकार), स्वप्निल तरे (विद्यार्थी भारती राज्य संघटक) या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली होती.
महिलांनी संविधानात असलेले आपले सर्व अधिकार जाणले पाहिजेत तसेच आजच्या घडिला महिलांनी सक्षम होणे ही काळाची गरज आहे असे ज्योती बडेकर यांनी म्हटले. तसेच संविधान जागर गावोगावी होणे गरजेचे आहे असे मत विद्याधर ठाकूर यांनी मांडले.
सफाळे सरूपाडा विभागात उभे राहिलेल्या संस्थेच्या कामाचे भरभरून कौतुक विनिशा धामणकर यांनी केले. संविधान वाचविण्या सोबत वाढविण्याची ही नित्तांत आवश्यकता आहे असे आवाहन स्वप्निल तरे यांनी केले. सोबत संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण होऊन हा उपक्रम पार पढल्याचे संस्थेच्या MD मोनाली भोईर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close