खबरे

पालघर जिल्हा : ५७ वीज वाहिन्यां मध्ये तांत्रिक बिघाड , अंदाजे ७५ ,००० ग्राहकांचा वीजपुरवठा झाला खंडित

पालघर / नीता चौरे,4 अगस्त  : पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रविवारी पालघर महावितरण विभागात एकूण ५७ वीज वाहिन्यां मध्ये तांत्रिक बिघाड होता . त्यात अंदाजे ७५,००० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे झाडं वीज वाहिन्या वर पडल्यानं आज महावितरण चे लघु दाब वाहिनीचे १४ पोल , उच्च दाब वहिनीचे ०६ पोल आणि ०५ रोहित्रांचं नुकसान झालं.

वीजपुरवठा खंडित झालेल्या ५७ वीज वाहिन्यां पैकी ३५ वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तर उर्वरीत २२ वीज वाहिन्यांवरील पुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे कामात अडचणी निर्माण होत आहेत. तसचं मनोर आणि इतर ही काही भागात पाणी साठलं असल्यानं कामात अडथळा निर्माण होत आहे.

उर्वरित अंदाजे २७००० ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.या नैसर्गिक आपत्तीत ग्राहकांनी सहकार्य करावे असं आवाहन महावितरण कडून करण्यात आलं आहे .

/

पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

Related Articles

Back to top button
Close