पालघर जिल्हाधिकारी मध्यवर्ती कार्यालयाकडे परीवहन मंडळांची मिनी बस सेवा सुरु.

हर्षद पाटिल .
पालघर जिल्हाधिकारी मध्यवर्ती कार्यालयाकडे जाणा-या प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या मार्गावरील प्रवाश्यासाठी येत्या १ मार्च पासुन परीवहन मंडळांची मिनी बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. बोईसक कडे जाणा-या आणि बोईसर कडुन येणा-या सर्व बसेस जिल्हाधिकारी कार्यालय ( चिंतुपाडा) अश्या धावणार आहेत. पालघर रेल्वे स्टेशनपासुन पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी शेअर रिक्षा किंवा बस वाहतुक सेवा कार्यरत नसल्यामुळे प्रवाश्यांना खाजगी रिक्षातुन प्रवास करावा लागत होता. यासाठी ज्यादा पैसे मोजावे लागत होते. पालघर रेल्वे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय हे अंतर जवळपास दीड ते दोन किलोमीटर असल्याने येथे शेअर रिक्षा अथवा बस वाहतुक व्यवस्था असावी अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली होती. अखेर जिल्हा निर्मिती झाल्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर या मार्गावर परीवहन मंडळांच्या बसेेस धावणार असल्याने प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही. दरम्यान बोईसर कडे जाणा-या गाड्या विस्तारीत जिल्हाधिकारी कार्यालय चिंतुपाडा येथुन सोडल्या जाणार असुन बोईसर हुन येणा-या गाड्या चिंतुपाडा येथे येणार आहेत. दोन्ही मार्गावरील अश्या तब्बल १०० फे-या या मार्गावरुन ये-जा करतील. या बसेस पालघर स्टेशन , पाचबत्ती, पालघर तहसिलदार कार्यालय, पालघर जिल्हा सत्र न्यायालय, पालघर जिल्हाधिकारी कार्यालय आणि चिंतुपाडा असे थांबे घेवुन धावणार आहेत. पालघर स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयासाठी प्रवाश्यांना सहा रुपये मोजावे लागणार आहेत.