खबरे
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा , पालघर चषक 2018 सारा इलेवन ने पटकावले
एस .चुरी ,पालघर,2 अप्रैल : पालघर चषक 2018 या मानाच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सारा इलेव्हन संघाने अंतिम फेरीत पवनसुत क्रिडा मंडळ चा धुव्वा उडवत एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख परतोषिकासह चषका वर नाव कोरले.
पांच दिवस चाललेल्या या क्रिकेट महासंग्रामाचे आयोजन संदीप परदेशी यांनी केले होते. या स्पर्धेत तृतीय क्रमांक वंदे मातरम पर्रणाली व चतुर्थ क्रमांक मॉडर्न शिरगाव यांनी पटकावले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून उमरोली संघा चा
फुरम ठरला. उत्कृष्ट फलंदाज पवनसुत संघाचा तुषार घरत ठरला . मालिकविर म्हणून उमरोली संघाचा धर्मेंद्र यादव याला गौरविण्यात आले. मॅन ऑफ द मैच हर्षद मेनन ठरला. या स्पर्धेत एकूण 32 संघांनी भाग घेतला होता.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभा साठी मुंबई क्रिकेट असोसिएशन चे उपाध्यक्ष पंकज ठाकूर उपस्थित होते. या वेळी ठाकूर यांनी स्पर्धेच्या आयोजना बाबत कोतुक करताना महिला क्रिकेट स्पर्धा घेण्याचे आवाहन केले. व आता मुंबई च्या संघात आपल्या पालघर जिल्ह्यातील सात खेळाडू खेळतात. महिला क्रिकेट ला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करताना , पालघर शहरात मुंबई क्रिकेट असोसिऐशन माध्यमातून दोन क्रिकेट विकेट बनवून देण्याचे आश्वासन त्यानीं दिले.
.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रवीण राऊत, जिल्हा परिषद बांधकाम सभापती दामोदर पाटील संदीप प्रकाश पाटील पंचायत समिती सदस्य प्राची पाटील विनायक दांडेकर, विजय राऊत, देवानंद वझे, सूर्यकांत धुळे ,पोसना संकटळू, हिंमत
शाह,पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी प्रभाकर पाटील उत्तम घरत आदी मान्यवर उपस्थित होते.