रिक्षा परवाना वाटपाचे वेळापत्रक जाहीर.उद्यापासून ५२४२ रिक्षा परवान्यांचे वाटप.
विजेत्या उमेदवारांची मराठी भाषेची मौखिक चाचणी
मुंबई, दि. 26 : लॉटरी पध्दतीने ऑटो रिक्षा परवाना विजेत्या उमेदवारांची उद्या 27 फेब्रुवारीपासून मराठी भाषेची मौखिक चाचणी घेण्यात येणार असून या मुलाखती वडाळा येथील ट्रक टर्मिनल, बी-2, 3 रा माळा येथे घेतल्या जाणार आहेत. तरी या मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रतींसह उपस्थित रहावे असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पूर्व) यांनी कळविले आहे .14 जानेवारी 2016 रोजी लॉटरीद्वारे विजेत्या उमेदवारांना प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयाद्वारे 27 फेब्रुवारीपासून इरादापत्र वाटपास सुरुवात होत असून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्याच दिवशी इरादापत्र देण्यात येणार आहे.
दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते सायं. 7 वाजेपर्यंत विजेता क्रमांक 01 ते 7484 (एकूण 1200 उमेदवार), 28 फेब्रुवारी रोजी विजेता क्रमांक 7487 ते 15290 (एकूण 1200 उमेदवार) यांना सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मौखिक चाचणी झाल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना त्याच दिवशी परवाना इरादापत्र देण्यात येणार आहे.29 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत परवाना वाटप केले जाणार असून29 फेब्रुवारीरोजी विजेता क्रमांक 15295 ते 18509 (एकूण 500 उमेदवार), 1 मार्च रोजी विजेता क्रमांक 18514 ते 21752 (एकूण 500 उमेदवार), 2 मार्च रोजी विजेता क्रमांक 21759 ते 25162 (एकूण 500 उमेदवार), 3 मार्च रोजी विजेता क्रमांक 25169 ते 28560 (एकूण 500 उमेदवार), 4 मार्च रोजी विजेता क्रमांक 28571 ते 31635(एकूण 500 उमेदवार), 5 मार्च रोजी विजेता क्रमांक 31637 ते 33846 (एकूण 350 उमेदवार) यांचीमौखिक चाचणी झाल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना त्याच दिवशी परवाना इरादापत्र देण्यात येणार आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी 1000 रुपये परवाना शुल्क व 15 हजार रुपये असे एकूण 16 हजार रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे. ही रक्कम RTO, Mumbai (East) यांच्या नावे काढलेल्या धनाकर्ष (डीडी) स्वरुपात असावी.या उमेदवारांना मुलाखतीच्या दिनांक व वेळेबाबत एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई पूर्व यांनी कळविले आहे.
आवश्यक कागदपत्रे :
लॉटरीव्दारेऑटोरिक्षा परवाना करिता विजेता म्हणून निवड झालेल्या उमेदवारांनी अर्ज, विजेत्या यादीतील संगणकीय पानाची छायांकित प्रत अनुज्ञप्ती किंवा पिवळे कार्ड व प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पु.) क्षेत्रात वास्तव्याचा पुरावा उदा. निवडणुक ओळखपत्र, निवडणूक यादी, आधार कार्ड, पासपोर्ट, वीज देयक, मालमत्ता कर देयक या कागदपत्रांच्या मुळ व छायांकित (झेरॉक्स) प्रतींसह उपस्थित राहावे.