प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणच्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक
नीता चौरे ,मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं असून महावितरणने या चित्ररथात विजेमुळे शेती आणि शेतीमुळे प्रगती या संकल्पनेवर आधारित देखावा तयार केला होता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी ला मुंबई मधल्या शिवाजी पार्क इथं महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या विविध विभागांच्या वतीनं चित्ररथाचं प्रदर्शन करण्यात आलं होत .
या कार्यक्रमाला मॉरिशियसचे पंतप्रधान प्रवींद जुगनॉथ, महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी गावच्या समुद्र किनारी रंगणार सातवा चिकू फेस्टिवल…………
याप्रसंगी महावितरणने विजेमुळे शेती आणि शेतीमुळे प्रगती या मुख्य संकल्पनेवर आधारलेला देखावा चित्ररथासाठी तयार केला होता. यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स्, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, सौभाग्य योजना, उच्चदाब वीज वितरण प्रणाली या योजनेंच्या यशस्वीतेवर आधारित देखाव्यांचा समावेश होता.या चित्ररथाच्या देखाव्याचं मान्यवरांनी कौतुक केलं .
महावितरणच्या या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं असून सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता संतोष क्षिरसागर, सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे व मुंबई विद्यापीठाच्या अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस्चे संचालक डॉ. मंगेश बनसोड यांच्या निवड समितीनं चित्ररथाचं नामांकन निश्चित केलं .
हा चित्ररथ कन्सेप्ट कम्युनिकेशन या एजन्सीच्या माध्यमातून तयार करण्यात आला. महावितरणच्या यशाबद्दल ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी सर्वसंबंधितांचं कौतुक केलं आहे.
पालघर जिल्ह्यातल्या दिव्यांग विदयार्थ्यांच्या कला,क्रिडा स्पर्धा संपन्न……….