पालघर जिल्हा नियोजन समितीमधील 32 अशासकिय सदस्यांचा निकाल आज जाहीर.
हर्षद पाटिल –
पालघर जिल्हा नियोजन समितीमधील 32 अशासकिय सदस्यापैकी नऊ सदस्यांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये ग्रामीण निर्वीचित क्षेत्रातील पाच जागांसाठी दिलीप जयराम गाटे 10 मते , अशोक सिताराम भोये 9 मते, विजय सूरेश खरपडे 9 मते , कमळाकर अन्या दळवी 9 मते व काशिनाथ चौधरी सहा मते मिळवून विजयी झाले आहेत. तर प्रकाश कृष्णा निकम यांनाही 6 मते पडली होती, त्यानंतर काशिनाथ गोविंद चौधरी व प्रकाश निकम यांच्यात चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार घोषित करण्यात आला.
तर महानगरपालिका निर्वीचित क्षेत्रातील तीन जागांवर हार्दिक रविद्र राऊत 33 मते, उमेश दत्तात्रय नाईक 33 मते , लाॅरेल डायगो डायस 32 मते मिळवीत विजयी झाले आहेत. तर धनजंय विठ्ठल गावडे यांचा पराभव होवून त्यांना अवघी 4 मते मिळाली आहेत. नगरपालिका निर्वाचित क्षेत्रासाठीच्या एका जागेवर जबरदस्त लढत पाहायला मिळाली. यामध्ये शिवसेनेचे अतूल पाठक यांनी राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांचा एका मतांनी पराभव केला आहे. जिल्हा नियोजन समितीमधील ३२ जांगापैकी २३ जांगा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या.
जिल्हा नियोजन समीतीच्या अशासकिय सदस्यामध्ये ग्रामीण निर्वीचित क्षेत्रातील १८ सदस्य आहेत , तर महानगरपालिका निर्वीचित क्षेत्रासाठी तेरा सदस्य असून महानगरपालिका निर्वीचित क्षेत्रासाठी तेरा जागा नगरपालिका निर्वाचित क्षेत्रासाठी एक सदस्य निवडले गेले आहेत. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्हा नियोजन समितीकडे सर्वाचेच लक्ष लागले असून जवळपास 60 सदस्य या समितीत असतील. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तर जिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतील. या समितीमध्ये जिल्हा तील सर्व आमदार, खासदार , जि.प. अध्यक्ष यांच्यासह पालकमंत्र्यांचे 12 निमंत्रित सदस्य तसेच शासकिय प्रमुख अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
चौकट – ग्रामीण निर्वाचित क्षेत्रातील अनूसूचित जमातीच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीत तीन भाजप, एक शिवसेना तर एक राष्ट्र वादी काँग्रेसचे सदस्य निवडून आले, तर शिवसेनेच्या एका सदस्याचा पराभव झालाय. अपूरे संख्या बळ नसतानाही राष्ट्र वादीचे काशिनाथ चौधरी यांनी शिवसेनेचे पराभूत सदस्य प्रकाश निकम यांच्या शी बरोबरी साधून चिठ्ठीच्या साहाय्याने विजय संपादन केला आहे. तर सेनेचे प्रकाश निकम यांना सेनेतील मतांनी दगा दिल्याने पराभव स्वीकारावा लागला आहे.