नव्या वैचारिक मूल्यांची उभारणी साठी लोकप्रभाव संस्थेच्या उद्घाटन
पालघर : लोकांनी लोकांसोबत लोकांकडून उभारलेली संस्था म्हणजे ‘लोकप्रभाव संस्था’ गेली चार वर्षे आदिवासी भागात मुलांच्या शालेय गळती तसेच त्यांचे जीवन स्वास्थ यावर काम करतो आहोत. परंतु आता एक छत्री असणे गरजेचे आहे म्हणून संस्था रजिस्टर केली असे संस्थेच्या खजिनदार सुकन्या भोईर यांनी म्हटले आहे.
लोकप्रभाव या संस्थेचे उद्घाटन म्हणजेच आम्हाला सामाजिक, वैचारिक हितचिंतनकांसोबत एक बैठक घ्यायची इच्छा होती. जेणे करून आम्हाला त्यांच्या सल्ल्यातून आमच्या कामला नवी एक दिशा मिळावी आणि कामाला नव्याने जोमाने सुरुवात करावी. यासाठी ही बैठक योजिले होती त्या बैठकीस 20 ते 25 जणांची उपस्थिती होती. असे संस्थेच्या उपाध्यक्षा मोनाली भोईर-तरे यांनी म्हटले आहे.
सभेत उपस्थिती सर्व मान्यवरांनी एकमेकांच्या हाताने माती पास करून ती माती एका रोपट्याला देण्यात आली व त्यानंतर त्या रोपाट्याला पाणी देऊन व संस्थेचे लोगो लाँच करून संस्थेचे छोट्याखानी उद्घाटन करण्याचे आले. समाज्याला प्रगल्भ करून आणि समाज्यातील भुरसटलेला विचारांना एकमेकांचे सहाय्यने झुगारून देऊन नव्या वैचारिक मूल्यांची उभारणी करून सुज्ञ समाज घडवीणे हे उद्घाटणाचे वैशिष्टय होते असे संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल तरे यांनी म्हटले आहे.
बैठकीस नेताजी पाटील, प्रमोद पाटील, नामदेव कुडू, ज्योती केळकर, विद्याधर ठाकूर, दिनेश ननोरे, प्रकाश लवेकर, सविता ननोरे या वैचारिक व सामाजिक हितचिंतकांची उपस्थिती होती असे संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक दत्ता वाघमारे यांनी सांगितले. असे संस्थेच्या सचिव स्नेहा घरत यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.